ते फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते. सकाळी मी गॅलरीत उभा होतो आणि शेरलॉक होम्स आत आरामखूर्चीत पडून होता. तेवढ्यात रस्त्यात एक माणूस भ्रमिष्टासारखा हातवारे करत व मोठ्याने ओरडत पळत आमच्याकडेच येत होता. तो शेरलॉक होम्सकडे आला आणि त्याने जी कथा शेरलॉकला सांगितली ती अद्भूत होती. ती व्यक्ती म्हणजे होल्डर ॲन्ड स्टीफन्स बँकेचे प्रमुख ॲलेक्झांडर होल़्डर होते.