दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... मनुष्याची आध्यात्मिक इंद्रियं ही प्राकृतिक इंद्रियांनी बद्ध असतात. पण भगवंतांची इंद्रियं ही अविकारी आणि दिव्य असतात. ती निर्गुण असूनही सृष्टीला धारण करतात आणि सृष्टीतल्या केवळ गुणांचा उपभोग घेतात. मनुष्य अपूर्ण आहे. त्यामुळे बाह्य इंद्रियांची त्याला आवश्यकता असते. परंतु जे पूर्ण आहे त्याला अपूर्ण इंद्रियांची आवश्यकताच नसते.